प्रगतशील शेतकरी व म्हशी,शेळ्या,पशु पालन करणारे विठ्ठल जांभेकर यांचा अल्पशा आजाराने निधन,

कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे आमडोशी गावचे प्रगतशील शेतकरी व म्हशी शेळ्यांचे पालन करणारे त्याचबरोबर  दुध व्यवसाय करत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे  विठ्ठल तुकाराम जांभेकर यांचे हे  गुरुवार दि.१० सप्टेंबर २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याने जांभेकर परिवरांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात शोककळा पसरली आहे.

विठ्ठल तुकाराम जांभेकर हे कष्टकरी आणि मेहनती शेती बरोबरच त्यांनी म्हशी व शेळ्या पालन करून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून  यांचा पालन पोषण करत त्याच बरोबर दुग्धव्यवसाय करत आपले कुटूंब चालवत असत त्यांचे आकस्मित दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होते.

ते सर्वांच्या परोपकरी पडणारे शांत आणि  मायाळू स्वभावाने ते सर्वाना सुपरिचित होते.त्यांनी शेती बरोबरच पशु पालन म्हणून म्हशींचे व शेळ्यांचे सांभाळ करत व दुधाचा व्यवसाय करुन आपल्या  कुटुंबाचा उदर्निवाह केला.परंतु त्यांच्या अचानक निधनाने आमडोशी वाकण परिसरात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

सामाजिक बांधिलकीची जतन करुन शेती व्यवसाय म्हशी व शेळ्या पालन करणारे विठ्ठल जांभेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुलगे वासुदेव व सोपान,सुना  नातवंडे असा मोठा जांभेकर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१९ व उत्तरकार्य (तेरावे )विधी मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी  आमडोशी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे,