पनवेल (संजय कदम) : पनवेल येथील रहिवासी असलेल्या व सध्या एम. बी. मोरे फाउंडेशनच्या आर्ट कॉमर्स सायन्स महिला कॉलेज च्या प्रिन्सिपल म्हणून पनवेल येथे कार्यरत असलेल्या प्रणिती प्रभाकर काळे-खेरडे यांना परिवर्तन सामाजिक संस्था पुणे व जगदिशब्द फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
प्रणिती प्रभाकर काळे-खेरडे यांनी मुंबई विद्यापीठातून अनेक विषयात एम ए केले असून त्या नेट सेट परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याच प्रमाणे त्यांना साहित्यिक समाजसेविका व एक उत्तम वक्त्या म्हणून त्यांनी समाजात ओळख आहे. त्यांनी आता पर्यंत सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाची दाखल घेऊन त्यांना परिवर्तन सामाजिक संस्था पुणे व जगदिशब्द फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यश बद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.