प्रदिप वाळंज यांचे अल्पशा आजाराने निधन

नागोठणे (महेश पवार) : नागोठणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर जवके यांचे मेहुणे प्रदिप दगडू  वाळंज यांचे  वयाच्या ७१ व्या वर्षी नागोठणे जवळील किहिरे येथे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी निधन  झाले.
कै. प्रदिप वाळंज हे ठाणे येथील अनब्राको कंपनीतूल निवृत्त झाले होते. कै. वाळंज यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नात असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तर कार्य बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी कुहिरे येथे होणार आहे. अशी माहिती सुधाकर जवके यांनी दिली आहे.