प्रसिद्ध शायर ‘राहत इंदौरी’ यांचे कोरोना संक्रमणाने निधन

इदौर – प्रसिद्ध  गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले . त्यांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं त्यामुळे उपचारासाठी त्यांना मध्यप्रदेशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना ऑरबिंदो रुग्णालयात उपचारासाठी हलवल होतं. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी ही माहिती दिली होती.

माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ऑरबिंदो रुग्णालयात मला दाखल करण्यात आले आहे. प्रार्थना करा, मी लवकरात लवकर बरा होवो,माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.