प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पद्म विभूषण पंडित जसराज यांचे अमेरिके मध्ये निधन

न्यूज जर्सी : प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. . वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.