माथेरान (मुकुंद रांजाणे) : प्रेम लक्ष चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्रेमा लक्ष्मण विद्यालय शाळेचे आठरावे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा स्वराज्य जननी जिजामाता उद्यान पेणकर पाडा येथे उत्साहात झाला.यामध्ये कोळीगीत, गणेशवंदना, गुजराती गरबा, गोंधळ गीत,स्त्री -भ्रूण हत्या या विषयावर नाट्य प्रदर्शन करीत मल्लखांब प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष हरेश गावंड, माजी सैनिक जी. बी. सिंग, कर्नल नागेंद्र कुमार गुप्ताजी, वीर पत्नी प्रतिभा सुधाकर भट, मीरा भाईंदर सुपुत्र कौस्तुभ राणे यांचे पिता प्रकाशकुमार राणे , मातोश्री ज्योती राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम, निर्बादेवी युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण कांदळगावकर, महाकाली पतसंस्था अध्यक्ष लक्ष्मण पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस चे सेक्रेटरी नवनाथ पवार यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या दरम्यान सामजिक राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.
शाळेच्या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या सीईओ मंजीत कौर यांनी सत्कार केला.जिल्हास्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेचे कार्याध्यक्ष दिपेश गावंड यांनी सत्कार केला व खेळात आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.शाळेच्या संचालिका नंदाताई गावंड यांनी एस एस सी बोर्डात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला करुन शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.