पुणे : शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. यानंतर भाजपकडून अण्णांची मनधरणी करण्यात येत होती.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला.
सात भेटी घेऊन चर्चा केल्यानंतर अण्णा हजारे यांना उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यात भाजपला यश आलं आहे.
केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाल्याचं मान्य केलं. त्यावर केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यामुळे मी नियोजित उपोषण मागे घेत असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं.