PEN टाइम्स ऑनलाइन टीम : अशुद्ध पाण्यामुळे कॉलरा, डायरिया, कावीळीसारखे आजार वेगाने पसरतात. यासाठी शुद्ध पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. शुद्ध पाणी प्यायल्यास सुमारे 80 टक्के आजार दूर राहतात, असे जाणकार सांगतात. पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा वापर केला जातो. परंतु, याचा वापर न करताही पाणी शुद्ध होऊ शकते. हे पर्याय जाणून घेवूयात.
हे आहेत पर्याय
१ उकळणे
पाणी उकळून घेतल्यास अनेक बॅक्टेरिया, त्रासदायक जंतू यांच्यापासून बचाव होतो.
२ तुरटी
पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवावी. यामुळे गाळ खाली बसतो. मग उरलेले पाणी गाळून, उकळून प्यावे.
३ स्वच्छ कापड
नळाला पिशवी किंवा स्वच्छ धुतलेले कापड बांधून पाणी गाळून घेता येते. नंतर ते उकळून घ्यावे.
४ नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर
नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर्समुळे पाणी स्वच्छ होते.
५ गाळणे
पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळून स्वयंपाकासाठी वापरावे.
(टीप: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)