फेसबुकच्या माध्यमातुन नागरीकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणारी महिला जेरबंद

aaropi
पनवेल (संजय कदम) : फेसबुकच्या माध्यमातुन लोकांशी संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दारुमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तु चोरी करणाऱ्या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
सदर घटनेतील फिर्यादी महेश कृष्णा पाटील यांची फेसबुकचे माध्यमातुन समृध्दी खड़पकर (वय २९) या महिलेशी ओळख झाली. सदर महिलेने त्यांना फसबुकचे माध्यमातुन खोणीगांव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलाविले. सदर हॉटेलमध्ये गप्पा करताना तिने त्याचेवर प्रेम करते असे दाखवुन त्याचा विश्वास संपादन केला. त्यास सदर हॉटेलमध्ये असलेल्या लॉजचे खोलीत घेवुन गेली. फिर्यादी हे बाथरुममध्ये गेल असता सदर महिलेने महेश यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर, सॅमसंग फोल्ड-३ मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घडयाळ असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज घेवुन पळुन गेली.
सदर महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता महेश यांच्याकडे नव्हता. तसेच सदर घटनेत महेश यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर चोरीस गेले होते. सदर रिव्हॉल्व्हरचा आरोपी महिला ही गैरवापर करण्याची दाट शक्यता असल्याने महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले.
फेसबुकच्या माध्यमातून सदर महिलेने संपर्क केला असल्याने त्यावरुन सदर महिलेचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. सदर महिलेचा शोध घेतला असता ती गोवा येथे असल्याचे समजले. त्याप्रमाणे गोवा येथून समृध्दी खड़पकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता बदनामीचे भितीने लोक तक्रार करीत नसल्याचे पाहुन तिने अश्याप्रकारे अनेक नागरीकांना गंडा घातल्याची कबुली दिली. तसेच सदर चोरलेल्या वस्तु तिचा साथीदार हा बाजारात स्वस्तात विकत असायचा.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गोवा येथून तिचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा (वय ३४) याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १६ मोबाईल फोन, ०१ दोन घडयाळे, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण २० लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची धडाकेबाज कारवाई कल्याण पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परीमंडळ ३ पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी शेखर बागडे, सपोनिरी अविनाश वनवे, सपोनिरी सुनिल तारमळे, पोहवा सुशांत तांबे, पोहवा सुनिल पवार, पोहवा राजेंद्रकुमार खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा विकास माळी, पोना शांताराम कसबे, पोना यलप्पा पाटील, पोना देवा पवार, पोना प्रविण किनरे, पोशि बालाजी गरुड, मपोहवा अरुणा चव्हाण, मपोना प्राजक्ता खरनार यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *