पेण ( प्रतिनिधी ) : बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाने टाळले आहे. व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याकरिता पेण येथे शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने पेण नगरपरिषदेच्या मैदानावर ‘चिकन महोत्सव’आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन लेगपीस, चिकन बिर्याणी व अंड्यांच्या पदार्थांचा मोफत आस्वाद देण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंधक सर्व निर्बध कटाक्षाने
पाळून या चिकन महोत्सवात ब्रॉयलर कोंबडीचे पदार्थ विशेष निमंत्रिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या महोत्सवाला खा. सुनिल तटकरे,पालकमंत्री अदितीताई तटकरे,आ.अनिकेत तटकरे,आ.महेंद्र थोरवे,आ. रवि पाटील,आ.महेंद्र दळवी,आ.जयंत पाटील,आ.भरत गोगावले,माजी आ.धैर्यशील पाटील,रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी,जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप किरण पाटील, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील,अँड.निलिमा पाटील, सुधाकर घारे,उपाध्यक्ष जि.प. सरिता म्हात्रे, डि.बी.पाटील, प्रमोद पाटील,रणधीर सोमवंशी खासदार, पेणचे प्रांत विठ्ठल इनामदार तहसीलदारअरुणा जाधव व कर्मचारी ,पोलीस खात्याचे कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व मान्यवरांना बॉयलर कोंबडी पासून बनवलेले विविध पदार्थ खाण्याकरिता निमंत्रित करण्यात आले आहे.
चिकन फेस्टिवलमध्ये मान्यवरांनी चिकनचे विविध पदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या मनातील बर्ड फ्लूची भीती निघून जाईल व पुन्हा कोंबड्यांच्या व्यवसायाला तेजी येईल असा विश्वास रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थाचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर व सचिव दीपक पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली आहे.