बापरे! भलामोठा किंग कोब्रा पकडला नैनितालमधील घरातून, पहा थरारक Video

नैनिताल : जर साप आणि इतर सरपटणारे प्राणी पहाणे तुम्हाला भितीदायक वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहाणे टाळू शकता, ज्यामध्ये एका भल्यामोठ्या किंग कोब्राला उत्तराखंडातील एका घरातून पकडण्यात आले. एका विषारी किंग कोब्राला नैनितालच्या एका घरातून वन विभागाच्या शीघ्रकृती दलाने कसे बाहेर काढले, ते या व्हिडिओत दिसत आहे. एका टेबलखाली हा किंग कोब्रा लपून बसला होता.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवेतील अधिकारी आकाश कुमार यांनी ट्विटरवर शेयर केला आहे. त्यांनी याचे श्रेय डीएफओ नैनिताल यांना दिले आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, साप पकडणारा त्या टेबलखाली गेला, जेथे किंग कोब्रा लपून बसला होता, आणि तेथून यशस्वीपेण त्याने कोब्राला पकडले. नंतर कोब्राला घराच्या छतावर नेण्यात आले. तेथे तो एका पोत्यात भरण्यात आला. दरम्यान, किंग कोब्राने त्यास पकडणार्‍याच्या गळ्याभोवती जेव्हा वेढा टाकला, तेव्हा उपस्थितांना अक्षरश: धडकी भरली होती. नंतर या किंग कोब्राला जंगलात सोडण्यात आले.

किंग कोब्राचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आल्यानंतर 35000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि शेकडो कमेंट मिळाल्या आहेत.