माणगांव (रविंद्र कुवेसकर) : माणगांव पोलीस ठाणे रजि. नं. ३५८/२०२२ भादवि कलम ३७९, ३४ चा गुन्हा दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रात्री ००.३० वा. मौजे कूंभे गावचे हद्दीत घडला असून दि.२१ डिसेंबर २०२२ रोजी सायं. १८.१२ वाजता दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी ओमकार महादेव शेट्टी, वय – २६ रा. रूम नं ३०४, ए विंग, पी जी रेसिडेन्सी महाड, तालुका महाड हे काम करत असलेल्या धारिया कन्स्ट्रक्शन यांचे मालकीचे मौजे कुंभे धरण येथे चालू असलेले बांधकामाचे ९० हजार रुपयांचे १२०० किलो वजनाच्या टीएमटी (tmt) स्टीलचे ३२ एम.एम. व २५ एम.एम. गेजचे लोखंडी रॉड निळ्या रंगाच्या टेम्पोत टाकून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अशी तक्रार माणगांव पोलिस ठाण्यात दिल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शना-खाली या धाडसी चोरीचा तपास सहा.पो.नि. मोहिते, पो.स.ई. गायकवाड, पो.शि. १३६१ शिंदे, पो.शि. १९०५ डोईफोडे, पो.शि. २२२० दहिफळे, पो.शि. ४८८ पाटील, पो.शि. २२२१ सगरे यांचे पथकाने दि २० डिसेंबर रोजी पहाटे या गुन्ह्यातील निळ्या रंगाच्या टेम्पोचा व चोरट्यांचा कसुन शोध घेतला असता, हा निळ्या रंगाचा टेम्पो व त्यामध्ये असलेले आरोपीत १).कार्तिक अशोक वाघमारे वय -२०, २) चेतन अशोक वाघमारे वय – २४, दोन्ही रा. सुकेळी आदिवासीवाडी, ता. रोहा, जि. रायगड, ३) मारूफ रशीद खान वय – ३३ रा. पुगाव, ता रोहा, जि. रायगड यांना पकडण्यात आले आहे.
या गुन्ह्यात ७ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो क्र एमएच १४ जेएल २२७८, त्यामधे असलेले ९० हजार रुपयांचे १२८० किलो वजनाचे टीएमटी(tmt) स्टीलचे ३२ एमएम व २५ एमएम चे लोखंडी रॉड, २ हजार रुपये किंमतीचे एक लोखंड कापायचे गॅस कटर, १० हजार रुपये किंमतीचे दोन भरलेले ऑक्सिजन सिलेंडर, ६ हजार रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा एचपी कंपनीचा १९ किलोग्राम चा एल.पी.जी. गॅस सिलेंडर, असा एकूण ८ लाख ८ हजार रुपये मात्र किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धाडसी गुन्ह्यातील आरोपींना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. गुन्ह्यातील आणखी पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध पोलिस वेगाने घेत आहेत.