बाळसई येथिल चंद्रभागा नावले यांचे अल्पशा आजाराने निधन

सुकेळी (दिनेश ठमके) :  नागोठणे जवळच असलेल्या बाळसई येथिल चंद्रभागा चंदर नावले यांचे रवि. दि.13 सप्टेंबर 2020 रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्ष होते.
बाळसई गावचे शिवसेना शाखाप्रमुख तसेच नागोठणे येथिल जोगेश्वरी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनिल नावले यांच्या त्या मातोश्री होत्या. चंद्रभागा नावले यांनी वेळोवेळी संपुर्ण कुंटुबाला केलेले बहुमुल्य मार्गदर्शन हे नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. त्यांचा स्वभाव अंत्यत मनमिळाऊ व प्रेमळ होता. नेहमीच हसरा चेहरा असणा-या चंद्रभागा नावले यांच्या निधनाने संपुर्ण नावले कुंटुब पोरके झाले आहे. त्यांच्यावर सोम.दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. बाळसई येथिल वैंकुठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला रा.जि.प. सदस्य किशोरभाई जैन, प.स.सदस्य संजय भोसले, सामजिक कार्यकर्ते मधुकर ठमके, जोगेश्वरी पतसंस्थेचे संचालक व पदाधिकारी तसेच आजुबाजुच्या परिसरातील नातेवाईक उपस्थित होते.
कै. चंद्रभागा नावले यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळ. दि.22 सप्टेंबर रोजी व उत्तरकार्य शुक्र. दि.25 सप्टेंबर 2020 रोजी बाळसई येथे होणार असल्याचे नावले कुंटुबियांकडुन सांगण्यात आले.