पनवेल (संजय कदम) : रंगभूमीवर नुकतेच 12500 प्रयोग सादर करून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारे जेष्ठ कलाकार प्रशांत दामले काल नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने पनवेल येथील फडके नाट्यगृहात आले होते.
पनवेल येथे नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी आले असता बाळासाहेबांची शिवसेना, पनवेलचे महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी त्यांच्या पनवेल शहरातील पदाधिकाऱ्यांसह प्रशांत दामले यांचे अनोखे स्वागत केले व सत्कार देखील केला.
हाउसफुल असलेल्या सभागृहात प्रेक्षकांच्या हातात फुलांच्या पाकळ्या देण्यात आला व प्रशांत दामले यांची नाट्यगृहात एन्ट्री होताच रंगमंचापर्यंत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर रंगमंचावर जाऊन नाट्यप्रयोग सुरू होण्याआधी शिवरायांची व नटराजाची प्रतिमा देऊन प्रशांत दामले यांचा शिवसेनेतर्फे भव्य आणि नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेने ही पालिकेच्या वतीने प्रशांत दामले यांचा सत्कार केला. यावेळेस महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महापालिका आयुक्त यांच्या सुविद्य पत्नी सौ देशमुख, उपायुक्त गणेश शेटे, बाळासाहेबांची शिवसेना चे पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख मंदार काणे, रमेश बेद तसेच ‘आमचे आम्हीच’ नाट्यसंस्थेचे नाट्य कलावंत व पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————
अनेक वर्ष आम्ही प्रशांत दामले… प्रशांत दामले ..असंच ऐकत आलो पण एवढ्या वर्षानंतरही प्रशांत ‘दमले’ असं कधीच ऐकलं नाही. एवढी एनर्जी येते तरी कुठून.. खरंच आपण कधीही न दमता न थकता रंगभूमीची सेवा व प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहा याच शुभेच्छा
—-प्रथमेश सोमण
———————————
सर्व पनवेलकर नाट्य रसिकांचे महानगरपालिका व बाळासाहेबांची शिवसेना यांचे मी या अविस्मरणीय स्वागताबद्दल आणि सत्कार बद्दल आभार मानतो. तुमच्या पुढील पिढीलाही नाटकाची गोडी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा. माझी बॅकस्टेज टीम, कौटुंबिक सपोर्ट आणि तुम्हा सर्व नाट्य रसिकांमुळेच मी ही उंची गाठू शकलो.