नवी दिल्ली : भारतात राफेल विमाने दाखल झाल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. आपल्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने धमकी दिली. ‘हिंदुस्थान पाच राफेल खरेदी करे या पचास ‘ हम तैय्यार है. दर्पोक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रकक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी केली.
लष्करावर जगात सर्वाधिक खर्च करणारा देश भारत आहे. त्यांनी शस्त्रास्त्रांची स्पर्धा लावली आहे असा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते इफ्तिखार यांनी केला. भारत असुरक्षित स्वत:ला समजत आहे राफेलमुळे काही विशेष फरक पडणार नसून पाकिस्तानला आपल्या लष्करी क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.
असेही ते पुढे म्हणाले. राफेलच नव्हे तर भारताच्या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमचाही सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत. लष्करावर होणारा खर्च हा पाकिस्तानपेक्षा जास्त असल्याने आशिया खंडात अशांतता निर्माण झाली आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले पाहिजे असे इफ्तिखार म्हणाले. कश्मीरमध्ये विशिष्ट धर्माची लोकसंख्या वाढवण्याचा भारत कट करीत असून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतोय असा आरोपही त्यांनी केला