बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

veshyaa
पनवेल (संजय कदम) : बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलानांविरोधात तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील तळोजा फेज २ येथील एका इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना मिळताच त्यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून काही महिलांसह मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर ऐवज असा हस्तगत करून सदर महिलांविरोधात भादवी कलम ३७० (३)सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४,५ अन्व्ये कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *