पनवेल (संजय कदम) : लोकल च्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बेलापूर ते खारघर रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे.
बेलापूर ते खारघर रेल्वे स्टेशन कि. मी. नं . – ३८/०९, ३८/१० जवळ अज्ञात लोकल ची ठोकर बसून एका इसमाचा मृत्यू झाला आहे.
त्याचे अंदाजे वय ३५ वर्ष , उंची ५ फूट ४ इंच ,अंगाने मध्यम ,रंग काळा सावळा ,चेहरा बारीक , नाक सरळ , दाढी – काळी वाढलेली आहे. अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचा पट्टया असलेला फुल शर्ट व निळ्या फिक्कट रंगाची जीन्स पँट घातलेली आहे.
या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा सहा. पोलीस निरीक्षक ए . एस . कणसे यांच्या शी संपर्क साधावा .