PEN टाइम्स ऑनलाइन टीम : सेलिब्रिटींची बॉडी पाहून अनेक तरूणांना त्यांचे आकर्षण वाटते. परंतु, काही तरूण तर यापुढे जातात, आणि सेलिब्रिटींसारखी बॉडी बनविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू करतात.
मात्र, चुकीच्या पद्धतीने जर हे प्रयत्न सुरू केले तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. हायप्रोटीन डाएट, स्टेरॉइड्स आणि हार्मोन्सचे इंजेक्शन, आदीचे दुष्परिणाम हे भयंकर असतात.
अल्पकाळात बॉडी बनविण्याच्या नादात थेट किडनीवर परिणाम होऊन ती निकामी होण्याच्या घटना घडत आहेत.
ही आहेत कारणे:-
१ कमी वेळात सिक्स पॅक्स तयार करण्यासाठी अतिव्यायाम करणे
२ व्यायामासाठी स्टेरॉइड्स घेणे.
३ हार्मोन्सच्या इंजेक्शनचा वापर करणे.
हे लक्षात ठेवा
* बॉडी बनविण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
* शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी व्यायाम करा.
* बॉलिवूडच्या कलाकारांचे अनुकरण करताना घाई करू नका.