पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील भंगार पाडा येथील काही जमिनी शासन मार्फत संपादित केली जाणार आहेत. परंतु तेथील राहती घरे तोडू न देण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.
या संदर्भात भंगार पाडा येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची आज भेट घेतली. शासन मार्फत गावा नजीक सर्वे नंबर 133/2,134/1,/2,134/3,1344अ,134/4क,134/4ब0 हे सर्वै असलेली जमीन संपादीत करणार आहेत.
त्यावेळी राहती घरे तोडली जाणार आहेत तरी सदर घरे वाचवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्याकडे केली असता मेट्रो सेंटरचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले यांची बबनदादा पाटील व ग्रामस्थांनी भेट घेऊन बैठक घेतली व यावेळी ग्रामस्थांची भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी दत्तात्रय नवले यांनी सुद्धा घरे न तोडण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक मेघा सुनिल दमडे, सुनिल कृष्णा दमडे ,कैलास बामा गोसावी, पांडुरंग कटेकर,विलास दमडे, कृष्णा दमडे, संदिप दमडे,भावेश दमडे,अतीश दमडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.