पेण (राजेश प्रधान) : पेण एज्युकेशन सोसायटीचे, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे ‘रसरंग’ वार्षिक स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात जल्लोषात पार पडले.
या समारंभासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक,अभिनेते किरण साष्टे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. कोरोना काळामध्ये सर्वात्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अभासी शिक्षण पध्दतीचं तंत्र अवगत करुन विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
दीपप्रज्वलनाने व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक,अभिनेते किरण साष्टे यांचे स्वागत प्रशांत ओक यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एसबी.धारप यांनी महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा आढावा घेतला. यावेळी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. महाविद्यालयीन वेगवेगळ्या समिती मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.
किरण साष्टे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या प्राचार्यांच, शैक्षणिक व युथ फेस्टिवल, महाविद्यालयाच्या सजावटीच कौतुक केले. आजच्या युवकांना सांंस्कृतिक क्षेत्रात सहभाग घ्यावा आपल्या कर्तुत्वाच्या माध्यमातून आपली स्वत:ची ओळख निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.
एज्युकेशन सोसायटीचे कुटुंब प्रमुख बापुसाहेब नेने यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यायला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
प्रा डॉ.देवीदास क.बामणे ह्यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यादरम्यान सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रा डॉ.देवीदास क.बामणे यांच्या पुस्तकाच प्रकाशन करण्यात आलं. मा. श्री.अँड. बापूसाहेब नेने यांनी प्रा डॉ.देवीदास बामणे यांच्या कर्तुत्वाच कौतुक केले.
या प्रसंगी प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्रीडा- स्पर्धत प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रेरणा श्यामसुन्दर पांडे विद्यार्थीनीला निंबस यामार्फत बक्षिस देण्यात आले. क्रीडा क्षेत्रात गोल्ड,सिल्वर व ब्रॉन्झ मेडल मिळवलेल्या विद्यार्थिनीना बॉक्सिंग कीट देण्यात आले.