भाऊसाहेब नेने महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

nene-college.1
पेण (राजेश प्रधान) : पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण – रायगड येथे  “डी.एल.एल.ई.युनिट” आणि ‘हिंदी विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रमाता ज्ञानज्योती सावित्रीबाईं फुले यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ‘शिवराज्य प्रतिष्ठान’चे अध्यक्ष ॲड.रोशन पाटील यांच्या ‘सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदानंद धारप, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित  होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, ॲड. मंगेश नेने यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविक केले. जातीयतेच्या चष्म्यातून बघण्यापेक्षा स्वच्छ,निकोप दृष्टिकोनातुन प्रत्येक गोष्टीकडे पाहिल्यास समाजाला,देशाला प्रगतीपथावर नेणं सोपं जाईल असं प्राचार्य म्हणाले, यानंतर डाॅ.देवीदास क. बामणे यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची सामाजिक कार्याचा परिचय दिला. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिले.यानंतर प्रमुख वक्ते ॲड. रोशन पाटील यांनी समाजात क्रांतीकारक बदल घडविणाऱ्या सर्व महापुरुषांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *