भाकरवड : अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील भाकरवड गावच्या स्व चांगुणा बाई विठ्ठल पाटील यांचे बुधवार दि 11 जानेवारी 2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
शेतकरी कुटुंबातील स्व चांगुणाबाई अत्यंत शांत प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांच्या काकी होत्या त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण भाकरवड परिसरावर शोकांतिका पसरली त्यांच्या पार्थिवावर भाकरवड गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यावेळी अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पार्थिवावर ग्रामस्थ मंडळ भाकरवड चे अध्यक्ष शंकर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला तर उपस्थित सर्वांच्या वतीने ह भ प रायगड भूषण विद्याधर महाराज निळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
चांगुणा बाई यांचा तरुण मुलगा गेल्या नंतर त्यांनी त्याचा धसका घेतला आणि त्याच्या विरहाने आजारी पडल्या अखेर त्यांची प्राणज्योत मावळली त्यांचे उत्तर कार्य शुक्रवार दि 20 जानेवारी 2023 रोजी घरच्या स्वरूपात तर तेरावे सोमवार दि 23 जानेवारी 2023 रोजी राहत्या घरी होणार आहे. त्याच दिवशी सकाळी 10 ते 11 . 30 वाजता ह .भ .प सुभाष शेळके महाराज सांबरी यांचे प्रवचन ठेवले आहे. यांच्या पच्यात मोठा परिवार आहे.