भाजपा आक्रमक! पूर्ण वीज बिल माफ करण्यासाठी कार्यर्त्यांचे आंदोलन

पोलादपूर (शैलेश पालकर) :  तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले असताना निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त केले आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने अवास्तव विजबिले आकारणी करून ग्रामीण जनतेला पूर्णपणे नाडण्यास सुरूवात केली आहे.  पूर्ण विजबिले माफी करण्याची जोरदार मागणी करीत पोलादपूर तालुका आणि शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विजबिले जाळून आंदोलनही केले.

वाढीव विजबिलांबाबत आधी पोलादपूर महावितरणचे अभियंता सूद यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे यांनी चर्चा करून एक निवेदन देत संपूर्ण विजबिल माफीचे आवाहन महावितरणला केले. यावेळी पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, सरचिटणीस समीर सुतार, तुकाराम केसरकर, पद्माकर मोरे, घोसाळकर, महेश निकम, समाधान शेठ, सकपाळ, जयेश जगताप, भाई जगताप, मनोज मोरे, राजाभाऊ दीक्षित, नितीन बोरकर, सचिन मोरे, निलेश चिकणे, नामदेव शिंदे, पंकज बुटाला तसेच तालुका व शहर कार्यकारिणीचे आजी-माजी सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.