भारतीय लष्कराला हाय अलर्ट! अरूणाचल सीमेवर चीनचे सैन्य

नवी दिल्ली : भारताच्या अरुणाचल प्रदेश सीमेजवळ चीन सैन्याने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कराला हाय अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एलएसीजवळील केवळ २० ते २२  किलोमीटर अंतरावर चीनने बांधकामही सुरू केल्याने भारताच्या बाजूने सतर्कता बाळगण्यात आली आहे. लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीत आहे.

भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.

चीनचे सैनिक गस्त घालण्यासाठी एलएसीच्या अगदी जवळ येत असल्याचेही निरीक्षण भारताने नोंदवलेले आहे. तसेच चीनकडून होत असलेल्या बांधकामाचीही गंभीर नोंद घेतलेली आहे.