नागोठणे (महेंद्र माने) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी रविवार 15 जानेवारी रोजी नागोठणे नगरीत येत आहेत. भिडे गुरुजी नागोठणे विभागात प्रथमच येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,नागोठणे – रायगड विभागाच्या वतीने रविवार 15 जानेवारी रोजी ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात सायंकाळी 7.00 वाजता आयोजित केलेल्या बैठकीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचे श्री शिवशंभु चरित्र, धारातिर्थ गडकोट मोहिम, श्री रायगडावर पुनर्स्थापित होणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन तसेच हिंदवी स्वराज्य खडा पहारा या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीच्या निमित्ताने भिडे गुरुजी नागोठणे विभागात प्रथमच येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या बैठकीला विभागातील जास्तीत जास्त धारकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नागोठणे विभागाकडून करण्यात येत असून सदरील बैठकीला येताना प्रत्येकांनी डोक्यावर पांढरी वारकरी टोपी परिधान करुन येण्याची विनंतीही शेवटी केली आहे.