माथेरान (मुकुंद रांजाणे) : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या पाठिंब्याने व शिंदे गटाचे माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंचशील नगर मधील युवा नेतृत्व शुभम गायकवाड यांच्या सोबत रामदास सोनावणे, निखिल गायकवाड, प्रतीक पवार, आदित्य बनसोडे, ऋषिकेश सोनावणे, रोहन गायकवाड, अनिकेत गायकवाड,अक्षय बहाद्दूर,सलीम भाई,धीरज वालेंद्र, राजू गायकवाड, संदीप कोळी, प्रतीक नाईकडे,मनीष नाईकडे, संतोष शेलार,सनी जाधव,संतोष गायकवाड, मोहमद खान,असिफ शेख,प्रसाद पवार,अशा असंख्य युवा कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात दि.१७ रोजी शिवसेना शाखेत बिनशर्त पक्ष प्रवेश केला. यापुढे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे शुभम गायकवाड व सर्व युवा कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे येथील भीमसैनिकांनी शिवसेनेकडे वाटचाल केली आहे.
यावेळी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी सगळ्यांचे पक्ष प्रवेश करत शिंदे गटात स्वागत केले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश सुतार, संदीप शिंदे, अनिस शेख, अशोक वाघेला, निखिल शिंदे,मयुरेश कदम, अनिकेत जाधव,मयूर चौधरी, गौरंग वाघेला, अमोल चौगुले यांसह शिवसैनिक आणि महिला आघाडी, युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.