
माथेरान (मुकुंद रांजाणे) : ज्युनियर राष्ट्रीय जम्पिंग शो घोडेस्वारी स्पर्धा इक्वेस्टएरियन फेडरेशन ऑफ इंडिया ने भोपाळ(मध्य प्रदेश) येथे नुकतीच आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातून 34 स्पर्धकांनी भाग घेतला होता. घोड्यांच्या जम्पिंग शो स्पर्धेत माथेरानच्या किरण आखाडे यांनी दोन वेगळ्या स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. किरण बेंगलोरच्या युनायटेड क्लब कडून स्पर्धेत सहभागी झाला होता.
माथेरान हे घोड्यांचे माहेरघर आहे. या गावातून स्थानिक त्याचप्रमाणे परिसरातून येऊन इथे स्थायिक झालेले जागतिक कीर्तीचे अनेक घोडेस्वार( जॉकी) याच माथेरानच्या भूमीत निर्माण झाले आहेत.
किरण आखाडे याने घोडेस्वारीचे कौशल्य माथेरान येथे आत्मसात केलेले असून बंगलोर क्लब मध्ये घोडे जम्पिंग शोचे कौशल्य शिकला आहे.
मागील काळात माथेरान मधील अनेक मुलांनी विविध क्षेत्रात राज्यपातळीवर तसेच परदेशात जाऊन आपले करियर निर्माण केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्र असो किंवा क्रीडा स्पर्धा असोत त्यातच घोडेस्वारी मध्ये सुध्दा अनेक जणांनी आपला ठसा उमटवला आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी किरण दिनेश आखाडे याने जम्पिंग शो मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली असल्याने त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Related