मंगळवारी रा.स्व.संघ जनकल्याण समिती आयोजित सेवारथ यात्रा नागोठण्यात, शहर वासीयांसह ‘किशोर जैन’ करणार जोरदार स्वागत

kishor-jain
नागोठणे (महेंद्र माने) : रा. स्व. संघ जनकल्याण समिती या सेवाभावी संघटनेच्या वतीने समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त महाराष्ट्रात विवीध उपक्रम राबवले जात असून रायगड जिल्ह्यात सेवा रथयात्रा जन संपर्क सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे जोरदार स्वागत नागोठणे शहरात मंगळवार 20 डिसेंबर रोजी शहर वासीयांसह जि.प. सदस्य किशोर जैन करणार असून तेथे स्नेहसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समितीचे कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना सदरील सेवाभावी संघटना महाराष्ट्रात (विदर्भ सोडुन) गेली पन्नास वर्षे 1)शिक्षण,2) संस्कार, 3)आरोग्य, 4)कृषी, 5)स्वालंबन,6) आपत्ती विमोचन तसेच 7) पुर्वांचल या सात विभागात अविरतपणे सेवाकार्य करीत आहे.
समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त विवीध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेवारथ यात्रा असून समितीच्या सेवाकार्यांची माहीती देणे आणि जनसंपर्क करणे हे दोन प्रमुख उद्देश असलेला सदरील सेवा रथ मंगळवार 20 डिसेंबर ते मंगळवार 27 डिसेंबर या दरम्यान रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील रोहा, नागोठणे, जांभुळपाडा, पाली, इंदापुर, मांणगांव, गोरेगांव, लोणेरे, पोलादपूर, महाड, म्हसळे, श्रीवर्धन, तळा, मुरुड या प्रमुख शहरांत फिरणार आहे.
सदरील रथ मंगळवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता नागोठणे शहरातील शिवसेना शाखेजवळ येणार असून त्यांचे जि.प.सदस्य किशोर जैन हे शहर वासीयांसह जोरदार स्वागत करणार असल्याचे कुंटे यांनी सांगून तेथेच किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसभा आयोजित करण्यात येणार असल्याचे शेवटी सांगितले.
 सदरील कार्यक्रमाला सर्व बंधुभगिनींची उपस्थिती राहून जनकल्याण समितीच्या सेवा कार्यांची माहीती घेणे व यथाशक्ती सेवाकार्यात आपले योगदान देण्याचे आवाहन जनकल्याण समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *