नवीमुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून दि. 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.
या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. आणि मतमोजणी गुरुवार दि. 02 फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.
सर्व संबंधीत घाऊक आणि किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांना या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवून मद्यविक्री करण्यास मनाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उप आयुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.