उरण (विठ्ठल ममताबादे ) : महावितरणाचे (MSEB चे )अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांची कोटनाका -उरण येथील कार्यालयात वाढीव वीज बिल व वीज तोडणी संदर्भात मनसेचे महाराष्ट्र राज्य नाविकसेना राज्य उपाध्यक्ष संदेशभाई ठाकूर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण विधानसभा उपाध्यक्ष सतीश पाटील आणि मनसेचे कार्यकर्ते व वीज ग्राहक यांनी भेट घेतली.
यावेळी महावितरण तर्फे नागरिकांना देण्यात आलेल्या भरमसाठ वीजबिला बदल चर्चा करण्यात आली. लोकडाऊनच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्यात तर अनेक नागरिकांचे धंदे-व्यवसाय बंद आहेत अश्या काळात 20,000 ते लाखा पर्यंत असे भरमसाठ बिले नागरिकांना देण्यात आली आहेत अशी बिले न भरल्यामुळे महावितरणाने उरण तालूक्यातील विविध भागात ग्राहकांचे वीज तोडणी चालू केली आहे. ती त्वरीत थांबवावी व याबाबतीत नागरिकांना पर्याय द्यावा अशी विनंती मनसेच्या वतीने महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
महावितरणचे अधिकारी हरिदास चोंडे यांनी सांगितले की मार्च अखेर पर्यंत टप्याटप्याने वीज ग्राहकांनी आपली बिल भरावी आम्ही तो पर्यंत कोणतेही कार्यवाही करणार नाही असे आश्वासन अधिकारी चोंडे यांनी यावेळी दिली.