ममदापूर वाडी ग्रामस्थांच्या उपोषणाला यश ! दुसर्‍या दिवशीच नळाचे पाणी थेट गावात

karajat-pani
कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील ममदापुर ग्रामपंचायतीमधील आदिवासी ग्रामस्थांनी आपल्या वाडीपर्यंत नळ पाणी योजनेचे पाणी मिळावे यासाठी 8 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु केले होते. उपोषण सुरु झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सांयकाळी पाणी ममदापुरवाडीपर्यंत पोहचले होते आणि शेवटी तिसरी दिवशी ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले.
दरम्यान, आठ दिवस तेथे पोहोचणार्‍या पाण्याची तपासणी करणार आणि नंतर ममदापूर वाडीमधील आदिवासी कुटुंब यांच्या घरोघरी नळाचे पाणी पोहोचवण्यासाठी नळाची जोडणी करण्याची कार्यवाही सुरु करणार आहेत.
ममदापुर ग्रामपंचायत मधील ममदापुरवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नव्हते आणि त्यामुळे येथील आदिवासी ग्रामस्थांनी 8 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरु केले. त्यानंतर उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी सायकाळी नळ पाणी योजनेचे पाणी ममदापुर वाडीपर्यंत पोहचले होते. त्यावेळी उपोषणकर्ते उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तिसरी दिवशी साखळी उपोषण नेहमीप्रमाणे सुरु केले.
त्यानंतर जजिळ परिषद लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर पुन्हा एकदा ममदापुर येथे पोहचले. त्यांनी ग्रामपंचायत सरपंच दामा निरगुडा, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड तसेच काही उपोषणकर्ते यांना सोबत ममदापुर वाडीमध्ये पोहचले. तेथे नळपाणी योजना सुरु केली आणि तब्बल 14 फूट उंच पाण्याचा फवारा उडत असल्याने उपोषणकर्ते यांना वाडीपर्यंत पोहचले असल्याची खात्री झाली आणि सर्व तेथून पुन्हा उपोषण सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पोहचले. तेथे अनेक चर्चा झाल्या आणि शेवटी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
शाखा अभियंता धनगर यांनी ग्रामस्थांना तेथे सलग आठ दिवस पाणी पुरवठा सुरु राहील आणि त्यावेळी काही गळती असेल ते कळेल. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार ममदापुर ग्रामपंचायत यांच्याकडून नळजोडणी देणार येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज करावे लागणार आहेत, अशी माहिती सुजित धनगर यांनी दिली आहे. त्यावेळीस सरपंच निरगुडा आणि ग्रामविकास अधिकारी राठोड हेदेखील उपस्थित होते.
त्यावेळी उपोषणकर्ते हिरू मालू निरगुडा, कमळू मालू निरगुडा, चांगो देहू पारधी, गणेश निरगुडे, जगन कमळू दरवडा, जगदिश हाशा दरवडा, राजू गणपत झुगरे, रोशन विष्णुदास शिंगे, दशरथ कमळू निरगुडा,सचिन नारायण अभंगे, दीपक अनंता निरगुडे, अनंता पारधी, राम पारधी, संदेश दरवडा, हरी पारधी, चांगो पारधी, रमेश निरगुडे, नीलेश निरगुडे, काळूराम दरवडा, जगन दरवडा, कृष्णा हिरवे यांना ज्यूस प्यायला देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.त्यावेळी महिला विजया झुगरे,सुरेखा निरगुडे,अंजना पारधी, लक्ष्मी निरगुडे,हिराबाई निरगुडे,जिजाबाई ठोंबरे,अश्‍विनी पारधी,शोभा पारधी,मंजुळा पारधी, कुंदा निरगुडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *