कोलाड (श्याम लोखंडे ) : बाजारात आता सर्वच वस्तूंच्या किंमतीत दुप्पट भाव वाढले त्यामुळे आता खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्वत्र ग्राहक वर्गात एकच संतापाची लाट पसरली तर गरिबांवर पुन्हा महागाईची व चढ्या भावाची टांगती तलवार असल्याने सर्वत्र एकच संताप पहावयास मिळत आहे.
कोरोनाचा कहर सर्वसामान्यांच्या अखेर जीवावर वेतला कोरोना काळात गरिबांना घरपोच शासनासह विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून यांनी किराणा समान जीवनावश्यक वस्तू पुरविल्या मात्र त्याच जीवणाकश्यक वस्तूंचे भाव आता गगनाला भिडले त्यामुळे बाजारात किराणा सामान खरेदीसाठी येत असलेल्या ग्राहक वर्गात मात्र एकच संताप व्यक्त केला जात असून खाद्यतेल जीवनावश्यक वस्तू किराणा दरात वाढ झाल्याने आता महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडले, कोरोना काळात काही व्यवसाईकांनी चढा भावाने समान विक्री केले त्यात आता अधिकच भरमसाठ किंमती वाढल्याने किचनमध्ये महिलांना काही सुचेना घरात महिन्याला कमाईचा येणार एक रुपया आणि खर्च होणार दोन रुपये त्यामुळे हात मजुरी आणि मोल मजुरी करणारांची चांगलीच गोची भाव दरवाढीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याचे संकेत मिळत आहेत.
घरात गॅस कनेक्शन त्यामुळे घासलेट मिळत नाही गॅस बाटला परवडत नाही किराणा सामानात कडधान्य ही महागले तेल डाळी मीठ मसाला साखर चाहा सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तसेच हात मजूर काम करणारे गवंडी सुतार बेलदार विद्युत रोषणाई चे काम करणारे कामगार वर्ग यांच्या देखील सामानात भरमसाठ दरवाढ झाली असल्याने सर्वत्र एकच संताप होत आहे,
सातत्याने होणाऱ्या भाव वाढ दरवाढीवर नियंत्रण कोणाचे कोणत्या मालाची किती किंमत याचे काही गणित नाही मनाला वाटेल तो भाव पटलं तर घ्या नाहीतर जा अशी वेळ आता ग्राहक वर्गावर येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वच बाबतीत बाजारात समान खरेदीसाठी येणाऱ्या नागरिक ग्राहक वर्गाची पंचायत होत असतांना दिसत आहे.