आ. भरतशेठ गोगावले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, ‘या’ महत्वाच्या विषयावर केली चर्चा

महाड : महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी महाड शहर इमारत दुर्घटनेनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी ,कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ,दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले , रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे,तसेच पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद शेठ भोकरे, आदि मान्यवर या भेटी दरम्यान आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपस्थित होते.

महाड विधानसभा मतदार संघात सन 2005 पासून 2020 पर्यंत नैसर्गिक आपती पूल दुर्घटना बस दुर्घटना इमारत दुर्घटना ,अशा आपत्ती वारंवार घडत असल्याने या ठिकाणी एनडीआरएफ टीम महाड तालुक्यासाठी कायमस्वरूपीची देणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे” यांनी दिले असल्याने आमदार गोगावले यांच्या मागणीला त्वरित मान्यता मिळाली आहे .

एनडीआरएफ टीम महाड येथे कायमस्वरूपी ठेवण्यासंर्भात आणि महाड शहरालगत सावित्री नदीत वाढलेली जुठे काढण्यात यावीत या साठी “आमदार भरतशेठ गोगावले, यांनी दिले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे” यांना वर्षा निवासस्थानी लेखी निवेदन देऊनमुख्यमंत्री उध्दव साहेबांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली,

या वेळी आमदार गोगावले यांनी मुख्यमंत्री महोदयांना महाड येथे एनडीआरएफ टीम कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात विनंती करून निवेदन दिल्याची तात्काळ दखल घेत त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार गोगावले यांच्या मागणीला मान्यता दिली.

तसेच पुरामुळे महाड शहरात प्रत्येक वर्षी सावित्री नदीचे पाणी शिरत असल्यामुळे नदीत वाढलेले जुठे काढण्यात यावेत यासाठी देखील लेखी निवेदन देण्यात आले .या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार गोगावले यांच्या कडून तारीक गार्डन इमारत दुर्घटनेची माहिती घेऊन आपण दुर्घटना ग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उघड्यावर ठेवणार नसल्याचे सांगून त्यांना सर्व तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भरत गोगावले यांना दिल्याने बाधित कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे