महाडमध्ये आज कोरोनाच्या तोफा थंडावल्या : नवीन १३ रुग्ण २६ बरे झाले

महाड (रवि शिंदे ) : आज महाडमध्ये पुन्हा कोरोनाच्या तोफा थंडावल्या नवीन १३ रुग्ण तर २६ बरे झाले आहेत. यामुळे कालच्या वाढलेल्या चिंतेत आज दिलासा मिळाला आहे. साखळी तोडायची असल्यास घराबाहेर पडतांना सर्वांनी मास्क लावणे क्रमप्राप्त आहे.

आज महाडमध्ये १३ नवीन रुग्ण आढळले असून, यामध्ये बिरवाडी ४५ पुरुष भैरवनाथ बिरवाडी २० पुरुष ७० महिला कांबळे तफै बिरवाडी ५३ महिला ५३ पुरुष किंजळघर दतवाडी ४९ महिला दस्तुरीनाका २४ पुरुष मिलेक्ट्री बोर्डीग नवेनगर ६४ पुरुष मारुती मंदिर तांबट भूवन जवळ ३६ पुरुष ३० महिला साईकृपा बिल्डींग वीर रमेश कडू मार्ग ५६ पुरुष सावळाराम कॉलनी सरेकर आळी ६५ पुरुष घर नं. १७७४ काकरतळे महाड ६४ पुरुष.

आज महाड मध्ये २६ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण संख्या १२१८ विविध ठिकाणी उपचार सुरु १९८ आता पर्यत बरे झालेले रुग्ण १०७० तर ५० जणांचा मृत्यू आज थोडी समाधानाची आणि चिंतादूर करणारी घटना म्हणावी लागेल.