महाडमध्ये नाल्यात आढळला तरूणाचा मृतदेह

महाड : शनिवारी सकाळी धनवंतरी हॉस्पिटल डॉ . चेतन सुवै यांच्या समोरच्या मुख्य नाल्यात देवेंद्र दिलीप सावंत ( पप्या ) ४२ सरेकर आळी महाड याचा मृतदेह आढळूण आला आहे. मृताच्या भावानी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबर नंतर तात्काळ पोलिसांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविछेदना नंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यांत दिला आहे. शहर पोलिस ठाण्यात देंवेंद्र सावंत याच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.