महाड (रवि शिंदे) : महाड तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. रूग्ण बरे होण्याचा दर वाढल्याने, श्री गणरायाच्या आगमनानंतर हा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. आज 37 जण कोरोनामुक्त झाले. तर 26 जणांना कोरोनाची लागण झाली. तसेच उपचारादरम्यान 3 जणांनी जीव गमावला आहे.
महाडमध्ये आज 26 जणांना कोरोनाची लागण झाली असून, टोळ बु. 63 पुरुष, ढालकाठी 48, 17, 42 स्त्री, बिरवाडी 40 स्त्री, नांगलवाडी 55 पुरुष, साई पॅलेस 34 पुरुष, विन्हेरे 42 पुरुष, आदर्शनगर बिरवाडी 40 स्त्री व 32 पुरुष, सुर्या सो. तांबडभुवन 28 पुरुष, शुभलाभ कॉ. एमआयडीसी 30 पुरुष, नाते 32 पुरुष, महाड 54 पुरुष, काळीज 28 पुरुष, ओअन कॉ. 74 पुरुष, साईस्नेह कॉ. महाड 56 पुरुष, वहूर 43 पुरुष, कवेआळी महाड 45 पुरुष, मातृस्मृती बि. महाड 60 पुरुष, ओलान हौ.कॉ. 77 पुरुष, शुभलाभ बि. नांगलवाडी 39 पुरुष, चैतन्य आर्केड प्रभात कॉलनी 54 पुरुष, राजेवाडी 75 स्त्री, पारवाडी 22 पुरुष, देशमुख मोहल्ला 30 पुरुष यांचा समावेश आहे.
आज महाडमध्ये 37 रुग्ण बरे झाले आहेत. आदर्शनगर बिरवाडी 40 स्त्री, ओअन कॉ. 74 पुरुष व साई स्नेह कॉ. महाड 56 पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये 153 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून, अजूनपर्यंत 644 रुग्ण बरे झाले आहेत तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत महाड तालुक्यात 835 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.