महाड (रवि शिंदे ) : आज महाड मध्ये कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले असुन, २९ जनांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र मृत्यू दर ३.८ टक्क्याने वाढत असल्याने, महाड मधील कोरोना नियंत्रणा साठी प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
महाड मध्ये आज कोरोनाचे नव्याने ३४ रुग्ण आढळून आले असुन या मध्ये, शिवाजी नगर महाड ७५ स्त्री, आदर्शनगर बिरवाडी ५७ पुरुष, खरवली ४१ पुरुष, काळीज २० पुरुष, वरंध २५, २९, ४६, ३६ पुरुष व २३ स्त्री, तुडील ३४ पुरुष, नांगलवाडी ३६ पुरुष, कोटेश्वरीतळे २५ पुरुष व ४९ स्त्री, चिंभावे ५७ पुरुष व ४३ स्त्री, चोचिंदे ३९ स्त्री, नवेनगर ४४ पुरुष, पाचाड ६० पुरुष, दस्तुरीनाका ५९ पुरुष, बिरवाडी ५२ पुरुष, देशमुख मोहल्ला महाड ५३ स्त्री, बिरवाडी ६७ पुरुष, किंजळघर ७५ स्त्री, फौजी आंबावडे ३८ स्त्री व ३९ पुरुष, तळोशी ४० स्त्री, कुंभारआळी महाड ४२ पुरुष, सरेकरआळी महाड ४२ स्त्री, गोकुळ विर बापुराव चौक महाड ६९ पुरुष, विन्हेरे ४५ पुरुष, विरेश्वर मंदिर ५८ पुरुष, चिंभावे २५ पुरुष, चांदनी कोंड तुडील ४५ पुरुष व ११ स्त्री यांचा समावेश आहे. महाड मध्ये आज २९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाड मध्ये १६५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२३८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. अजुन पर्यंत महाड मध्ये कोरोनाच्या १४५८ रुग्णांची नोंद झाली आहे.
महाड तालुक्यात कोरोना मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. आज हा दर ३.८ टक्के एवढा आहे. महाड तालुक्यात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. या मध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणार्यांना तसेच थुंकणार्यावर आणि दुकानासमोर गर्दी करणार्यांवर जागच्या जागी दंडांत्मक कारवाई करण्याची गरज आहे. तरच बेजबाबदार लोकांमध्ये याची दहशत बसेल आणि कोरोना वाढीचे प्रमाण कमी होईल.