महाड इमारत दुर्घटना : तब्बल 26 तासांनंतर महिलेला वाचविण्यात बचाव पथकाला यश

महाड (रवि शिंदे) : काल सायंकाळी शहरांतील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 फ्लॅट मधील 97 रहिवाशांपैकी 78 रहिवाशी सुखरूप बाहेर पडले. तर ढिगार्‍याखालून एनडीआरएफने आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढले आहेत. तब्बल 18 तासांनंतर 4 वर्षाच्या बालकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. आता आणखी एका महिलेला तब्बल 26 तासानंतर जिंवत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

या महिलेचे नाव मेहरून्निसा अब्दूल हमीद काझी असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी एका पुरूषाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. या व्यक्ती प्रकृती ठिक आहे.