महाड (रवि शिंदे) : काल सायंकाळी शहरांतील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 फ्लॅट मधील 97 रहिवाशांपैकी 78 रहिवाशी सुखरूप बाहेर पडले. तर ढिगार्याखालून एनडीआरएफने आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढले आहेत. तब्बल 18 तासांनंतर 4 वर्षाच्या बालकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. या बालकासह 13 जणांना मलम्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 4 जणांचा शोध सुरू आहे. कोसळलेल्या इमारतीचा मलमा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
या दुर्घटनेत अद्यापपर्यंत नमीरा शौकत मसुरकर १९, संतोष सहानी २४, खालिदा रियाज पोरे, जय प्रकाश कुमार २४, दिपक कुमार २१, स्वप्नील प्रमोद शिकै २३, नवीद हमित दुष्टे ३२, या सात जखमीपैकी दोघाना मुंबई तर 5 जणांवर महाडमध्ये उपचार सुरु आहेत. तर सय्यद समिर ४५, नवीद झमाने ३५, आणि जिवंत सापडलेल्या मुलाची
आई यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर फारूख काझी यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि इंजिनिअर यांचा समावेश आहे.
काल सायंकाळी ६. १५ वाजता सदर इमारत पत्त्यासारखी कोसळली. नंतर रात्रीच बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरु होते. मलम्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या मुलाच नाव मोहम्मद बांगी वय ४ वर्ष आहे.
महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटना
मृत व्यक्तींचा तपशील :
1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.
2) नविद झमाने, वय 35 वर्ष
3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष
4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष
5) अनाेळ
खी स्री चा मृतदेह
6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष
7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष
8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष
9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष