महाड( रवि शिदें) : महाडकरांसाठी खूषखबर, तालुक्यात आज कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही, तर चार जनांनी कोरोनावर मात केली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत एंटीजेन टेस्ट घेण्यात येत आहे. यामुळे आता महाड तालुक्यांत कोरो ना साखळी तुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत गणपती उत्सवाआदी महाडकरांसाठी ती आनंदाची बातमी ठरणार आहे
कोरोना विरोधातील लढाईत महाडकरांना यश मिळताना दिसत आहे. मास्क, सॅनटरायीज, सोशलडीस्टंसच्या जनजागृतीने महाड तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत आहे काल रविवार पाच आणि आज महाड तालुक्यात एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडला नाही. तर चार जनांनी कोरोनावर मात केली आहे.
महाड तालुक्यातील दासगाव, चिंभावे प्राथमीक आरोग्य केंद्रात कोरोनाची एंटीजेन टेस्ट करण्यात येत असुन नागरिकांना ही टेस्ट मोफत करून मिळणार आहे, तरी सर्वांनी कोरोनाची एंटीजेन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी केले आहे. सदर टेस्ट जरी बंधनकारक नसली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ही टेस्ट करून घेण्यास विरोध होत आहे.