महाडमध्ये आज २१ जणांना कोरोनाची लागण, 12 रूग्ण बरे झाले, तर एकाचा मृत्यू

महाड (रवि शिंदे) :  महाड तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकचा मृत्यू झाला आहे.

‌महाड तालुक्यात आज पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला असुन, नव्याने २१ रुग्णांची नोंद झाली आहे, या मध्ये प्रभातकॉलनी ४७ स्त्री व २४ पुरुष, सिटीप्राईड प्रभातकॉलनी ४३ स्त्री, ढालकाठी ४५ पुरुष, कुंभारवाडा बिरवाडी ४० पुरुष, मोहत ४५ पुरुष, पिडीलाइट काॅलनी ४२ स्त्री, २० व ३८ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी ४४ पुरुष, हर्षाकाॅम्पेक्स महाड ५३ स्त्री, केएस‌एफ काॅलनी ७०, ४७ व ७० स्त्री, व ३०, ५७, ४३ पुरुष, आदर्शनगर बिरवाडी ६२ पुरुष, बापटनगर बिरवाडी ५२ पुरुष, सहाराकॉप्ल्पेक्स बिरवाडी ५० पुरुष, गोमुखेआळी महाड ७५ पुरुष यांचा समावेश आहे.

आज १२ जनांनी कोरोनावर मात केली आहे तर अमेहत हौस महाड येथील ६० पुरुषाचा मृत्यू झाला आहे. महाड मध्ये एकुण १७३ रुग्ण उपचार घेत असुन, ५३० जनांनी कोरोनावर मात केली आहे तर ३३ जनांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात अजुन पर्यंत ७३६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.