महाड (रवि शिंदे) : महाड तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आज महाड तालुक्यात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले असुन, १४ जनांनी कोरोनावर मात केली आहे, तर आज कोणाचा मृत्यू झालेला नाही.
महाड तालुक्यात आज कोरोनाचे नव्याने पाच रुग्ण आढळून आले असुन या मध्ये शिरगाव ३१, ६०, २४ स्त्री व २९ पुरुष, वरंध २८ पुरुष यांचा समावेश आहे. आज १४ जनांनी कोरोनावर मात केली आहे. महाड मध्ये १६९ रुग्ण उपचार घेत असुन, अजुन पर्यंत ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. महाड तालुक्यात ७१५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.