महाड : महाड तालुक्यात आज कोरोनाच्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तिघांनी कोरोनावर मात केली आहे.
महाड तालुक्यात आज कोरोनाचे नवे चार रुग्ण आढळून आलेत.
या मध्ये आकांक्षा अपा.काकरतळे ४५ पुरुष, सुदर्शन काॅलनी ५३ पुरुष, नांगलवाडी ७० स्त्री, नांगाव ३३ स्त्री यांचा समावेश आहे. तर तिघांनी कोरोनावर मात केली आहे. आज कोणाचाही मृत्यू झालेला नाही. महाड मध्ये १३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार होत आहेत तर ७७६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. अजुन पर्यंत महाड तालुक्यात ९५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.