महाड ( रवि शिंदे) : महाड तालुक्यात आज कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जनांनी कोरोनावर मात केली आहे. शासनाकडून प्रसिद्धीसाठी जारी करण्यात येणार्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने रुग्ण आणि पत्रकार यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे.
दरम्यान अंनत चतुदशी नंतर तात्काळ कोरोना संसर्ग हद्दपार होण्याचे गणेश भक्तांच म्हणन आहे. मात्र शासकीय यंत्रणेकडून कोरोना बाबत प्रसिद्धी पत्रकात प्रंचड चुका अढळत असल्याने कोरोना पाॅझीट रुग्णांची चुकीची नावे आणि पत्ते छापने, चुकीचे आकडे छापने असे घोळ महसुल विभागाकडून होत आहेत. या मुळे पत्रकार आणि रुग्ण यांच्यात संघर्षाची परस्थिती निर्माण होत आहे.
आज महाड मध्ये चार जनांना कोरोनाची लागण झाली असुन, या मध्ये वाकी ४७ पुरुष, दासगाव २६, ३० पुरुष, लक्ष्मी काॅलनी ५२ पुरुष यांचा समावेश आहे. आज पाच जनांनी कोरोनावर मात केली आहे. महाड मध्ये १६५ रुग्ण उपचार घेत असुन, ६६१ रुग्ण बरे झाले आहेत तर अजुन पर्यंत ८६६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.