महाडमध्ये कोरोनाचे १६ नवे रुग्ण; 24 जणांची कोरोनावर मात

महाड (रवि शिंदे) : आज महाडमध्ये कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले असुन, २४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आज कोणाचा मृत्यू झालेला नाही.

महाड तालुक्यात आज कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले असुन, या मध्ये नांगलवाडी ४७, १५ स्त्री, पिडीलाईट काॅलनी ४८ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी १६ पुरुष, मोर्या अपार्टमेंट काकरतळे ४५ पुरुष, वहूर ३३ पुरुष, चंद्रछाया निवास काकरतळे ३६ पुरुष, अमिना अपार्टमेंट शेख हाॅस्पीटल शेजारी ३४ स्त्री आणि १६ पुरुष, लक्ष्मीनगर बिरवाडी २३ पुरुष, न्हावी कोंड दासगाव ५२ पुरुष, प्रभात काॅलनी ३८ पुरुष, भिवघर ६५ पुरुष, साई पॅलेस आदर्श नगर महाड ३२ पुरुष व २९ स्त्री, कवेआळी ६७ स्त्री यांचा समावेश आहे. आज महाडमध्ये २७ जण कोरोनाचे उपचार घेऊन बरे झाले आहेत. महाड मध्ये १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ८२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाड तालुक्यात अजूनपर्यंत ९७५ रुग्णांची नोंद झाली आहे.