महाड मध्ये १६ कोरोनाचे रुग्ण आढळले , २० झाले बरे तर दोघांचा मृत्यू

अलिबाग :   महाड तालुक्यात आज कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २० जनांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज महाड तालुक्यात  कोरोनाचे १६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे या मध्ये एमबाॅय काॅलनी ५१ पुरुष, बिरवाडी २४ स्त्री, महाड एम‌आयडीसी ६२, ३१, २९ पुरुष व ५८ स्त्री, आकले ३२ पुरुष, नविपेठ महाड ४९, ९२ स्त्री, व्हाईटहाऊस महाड ४३ पुरुष, किये ३० स्त्री, ओमकार बिलं महाड ७९ पुरुष, काजळपूरा २९ स्त्री, खारखंड मोहल्ला ४१ पुरुष, शुभलाभ बि.संतोषनगर बिरवाडी ३५ पुरुष, गुरुदत्त अपा.प्रभात काॅलनी ५४ पुरुष यांचा समावेश आहे. तर २० जनांनी कोरोनाशर मात केली आहे. महाड मधील कुंबळे अप्परतुडील ५८ पुरुष आणि किंजळोली बु. ५८ स्त्री यांचा मृत्यू झाला आहे. महाड मध्ये १५१ रुग्ण उपचार घेत असुन, ७१५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर ४३ जनांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात अजुन पर्यंत ९०९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.