महाड लोक विकास सामाजिक संस्थेतर्फे साखर चौथ गणपतीची स्थापना

महाड(रवि शिंदे ) : माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे लोक विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक  माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून याही वर्षी  साखर चौथ गणपतीची स्थापना करण्यात आली आहे

शनिवारी सकाळी महाडचे  ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. लोक विकास सामाजिक संस्थेच यावर्षी गणपती उत्सावाच हे पाचव वर्ष आहे. साखर चौथ गणपती उत्सव हा विशेषता आगरी समाजाचा उत्सव मानला जातो. पेण पनवेल अलिबाग उरण कर्जत खालापूल खोपोलो या भागांत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा आहे

परंत दक्षिण रायगड मध्ये सुद्धा नोकरी व्यापार व्यवसायामुळे आगरी समाज बांधव इतरत्र स्तिरावला आहे.  लोक विकास सामाजिक संघटन महाडमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवणारी राजकारण विरहीत संघटना कार्यरत आहे. माणिकराव जगाताप यांनी साखर चौथ गणपती उत्सव दक्षिण रायगड मध्ये सुद्धा साजरा होवू शकतो, या संकल्पनेतून पाच वर्षापूर्वी या उत्सवास सुरुवात केली दोन दिवस सामाजिक मनोरंजन भजन किर्तन भव्य विसर्जन मिरवणूक अस या उत्सावाच स्वरूप होत.

लोकविकास सामाजिक संस्थेतफै माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव शशिकांत पगारे, प्रशांत म्हामुणकर कार्यकर्ते सुदेश कळमकर, मंगेश जगताप, राजेंद्र कोपै, संदिप जाधव, जगदिश पवार, गजानन काप, संदेश गोठल, साहिल हेलेकर, जिगर बुटाला, दिपक सुतार, शांताराम सुतार, राजू भाई, महेश शेडगे, अनिल अजगरे, संजय पवार, उमेश जगताप,पूजा जगताप, शितल पाटेक,र आदी विशेष मेहनत घेतली रविवारी सायंकाळी भोई घाट सावित्री नदी पात्रात साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.