महाड (रवि शिंदे) : महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे दोनशे लोक अडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवविण्यात आला आहे. महाड नगरपालिका आणि अन्य यंत्रणांनी ढिगारे उपसून जखमींना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. या दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृत्यु झाला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या इमारतीचा बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
एनडीआरएफदाखल, शोधकार्य सुरू
पुणे तळेगाव दाभाडे येथून महाडकडे येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात येऊन कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि रायगड पोलीस यांनी विशेष सतर्कता बाळगली होती. यामुळे रात्री एक वाजून दहा मिनिटांनी NDRF चे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहोचून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली.
अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं
महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमित शहांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे. NDRF च्या टीम घटनास्थळी थोड्याच वेळात पोहचून लवकरच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होईल, सर्वाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असं ते म्हणाले आहेत.
काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली त्यावेळेस या इमारतीमध्ये अनेक रहिवासी होते. इमारत कोसळल्याचे लक्षात येताच परिसरातील
नागरकिांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपल्या परिने मदतकार्य सुरू केले. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पंचवीस जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले होते. जखमींना तातडीने शहरातील शासकीय रूग्णालय त्याचप्रमाणे खाजगी रूग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ढिगारे हटवण्यिाचे काम सुरू करण्यात आले. मात्र इमारतीमध्ये सुमारे दोनशे लोक अडकले असून, या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेता एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. संपूर्ण इमारतच कोसळली असल्याने, या दुर्घटनेत काहींचा मृत्यु झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाडचे आमदार श्री. भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी देखील प्रशासनाशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती घेतली.
चार वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बिल्डर्सने पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. इमारतीमध्ये सुमारे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस फ्लॅट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हलत असल्याची तक्रार या इमारतीमधील रहिवाशांनी या बिल्डर्सकडे केली होती. मात्र या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ही इमारत हलत असल्याची तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणार्या बिल्डर्सवर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी या घटनेनंतर केली जात आहे.
Live update :
* गुन्हे दाखल करण्याचे आदेश, दरम्यान, या इमारतीचा बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
* या दुर्घटनेत आतापर्यंत बचाव कार्यातून 1 मृतदेह आणि 7 जखमींना रात्री 10 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
* एनडीआरएफची टिम पुणे येथून एक्सप्रेस हायवेने मुंबई – पुणे – खालापूर, मुंबई – गोवा महामार्गाने महाड येथे येण्यासाठी निघाली असून त्यांना लवकरात लवकर पोहचणे शक्य व्हावे, यासाठी संपूर्ण मार्ग ग्रिन कॉरिडॉर करण्यात आला आहे.
1 हि दुर्घटना कितीही दुदैवी असली तरी घटनास्थळ ते सपूर्ण परिसरात किमान पाच ते सात हजारांवर बघ्यांची गर्दी उसलळी आहे. महाड शहर तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मृंताचा आकडा पहाता ही गर्दीच जणू कोरोनाला निमंत्रण देण्याचा धोकाही या अपघाताबरोबर वाढला आहे
2 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाडमध्ये इमारत कोसळली, त्याबाबत आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली.
3 या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.
4 माणगाववरून 25 कामगार, गॅस कटर, 2 जेसीबी, 2 डम्पर, 3 अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टर रवाना.
5 पेणवरून सुद्धा मदत रवाना.
6 घटनास्थळी दहा जेसिबी, पोकलन, गॅसकटर, जनरेटर, तिन रुग्णवाहिका, डॉक्टर, असंख्य मजूर कार्यरत आहे. महाड ग्रामिन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक भास्कर जगताप यांनी घटना मेडिकल कॅम्प सुरु केला असून ढिगाऱ्याखालून निघणाऱ्या जखमिंवर उपचार करत आहे.
7 उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती घेतली.
8 घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे, सदर डेव्हलपर्स हा क्रेडाई महाडचा मेंबर नाही. सदरहू बिल्डिंगचे टेक्निकल तपासून घावे लागेल.
क्रेडाई महाड सदरहू घटनेचा निषेध करते.
– प्रशांत गुजर
क्रेडाई, अध्यक्ष, महाड.
मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती
* जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज.
* पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज.
* रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज
* मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे
* जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन
* सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून उद्याच रक्तदान शिबिराचे आयोजन
* संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष. घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.
* मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री कु.आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सतत संपर्कात.
* एनडीआरएफ ची पथके थोड्याच वेळात घटनास्थळावर पोहोचतील.
* पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा. मात्र मदत व बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्यास यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न.
* महाड इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या रहिवाशांना रक्ताची गरज आहे. महाड येथील चैतन्य सेवा संस्थेने रक्ताची तातडीची गरज ओळखून रक्तदान करण्यास सुरुवात केली आहे. चैतन्य सेवा संस्थेचे अध्यक्ष चेतन उतेकर यांच्या आवाहनानुसार संस्थेचे सदस्य त्याचप्रमाणे तरुणांनी जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्यास प्रारंभ केला आहे.