नागोठणे (महेश पवार) : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच सध्या महामार्गाची अत्यंत दारूण व भयानक बिकट अवस्था झाली आहे. या महामार्गाने आजवर कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले आहेत. तरीही गेली अनेक वर्षे महामार्गचे काम पूर्ण व्हायचे नाव घेतले जात नाही. गणेशोत्सवाच्या वेळी खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. आतातरी सरकारने मुंबई गोवा महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाची पळस्पे फाट्या पासून रत्नगिरी पर्यंत खड्डेमय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांचे प्रवास करताना अपघात घडत आहेत. गणेशोत्सव पूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करणार होते. मात्र चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच जावे लागले. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रडत-खडत सुरू आहे. आतातरी शासनाने हा महामार्ग सुस्थितीत करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
मुंबई गोवा महामार्गाची पळस्पे फाट्यापासून ते रत्नागिरी पर्यंत खड्डेमय अवस्था झाली आहे. या महामार्गावर प्रवास करतांना खड्डेमय रस्त्यामुळे खड्डे चुकवितांना वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहेत. या महामार्गाचे काम गणेशोत्सवापुर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवाला व गणेशोत्सव पूर्ण झाल्यावरही चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागली. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रेंगाळत सुरु आहे. त्यामुळे शासनाने आतातरी हा महामार्ग सुस्थितीत पूर्ण करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
देशातील अनेक महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होऊन दहा वर्षे उलटली आहेत. मुंबई-बेंगलोर, पुणे-हैद्राबाद, मुंबई-अहमदनगर, पुणे-औरंगाबाद असे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग याआधीच पूर्ण झाले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. २००५ पासून या महामार्गाचे काम सुरु करण्यात आले. परंतु काही ठिकाणी अद्याप राहिलेल्या भूसंपादनाच्या अडचणी, महामर्गाच्या चौपदरीकरणासाठी संख्येने एकापेक्षा अनेक असलेल्या ठेकेदारांची नकारात्मकता यामुळे महामार्गाचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे