महामार्ग पोलिस वाकण व जिंदाल रुग्णालय सुकेळी यांच्या वतिने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

dinesh

सुकेळी (दिनेश ठमके) : नागोठणे जवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणा-या महामार्ग पोलिस केंद्र वाकण व बि. सि. जिंदाल रुग्णालय सुकेळी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत महामार्गावरील व कंपनी चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शनि. दि. 13 फेब्रु. 2021 रोजी सकाळी 9.30 ते 4 येळेत करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन ऐनघर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. कलावती राजेंद्र कोकले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोहरभाई सुटे, महाराष्ट्र सिमलेस लि. कंपनीचे अध्यक्ष मुकेश दुबे, उपाध्यक्ष सी. के. गुप्ता, डी. जी. एम. आर. सी. गुप्ता, कमरशिअल हेड संजीव बँनर्जी, एस. एन. शर्मा, के. के. पांडे, सदस्य रोहीदास लाड, प्रकाश डोबले, भगवान शिद, पनवेल येथिल नेत्ररोग तज्ञ डाँ. तन्वी कोसले, डाँ. श्रंद्धा पटेल, जिंदाल रुग्णालयातील डाँ. प्रिया भोईर, जिंदाल रुग्णालयाचे व्यवस्थापक जयरमन नडार, जितेंद्र धामणसे, विट्ठल इंदुलकर, राजेंद्र कोकले, उत्तम जाधव, महामार्ग पोलिस कर्मचारी, जिंदाल रुग्णालयातील कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते.

दरम्यान महामार्ग पोलिस केंद्र वाकणचे पोलिस उपनिरीक्षक यांनी सर्व वाहन चालकांना वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमासंबधीचे पाळण करण्याचे आवाहन केले. यामध्ये दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे, चार चाकी वाहन चालवितांना सिट बेल्टचा वापर करणे, दारु पिऊन वाहन चालवु नये, वेगावर नियंत्रण ठेवणे अशा अनेक सुचना वाहन चालकांना देण्यात आल्या. या शिबिरात एकुण 60 वाहनचालकांनी तपासणी करुन या शिबिराचा लाभ घेतला. हा शिबिर यशस्वी करण्यासाठी महामार्ग पोलिस केंद्र वाकणचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम भोईर त्यांचे सर्व सहकारी, जिंदाल रुग्णालयाचे व्यवस्थापक जयरमन नडार, डाँ. प्रिया भोईर व रुग्णालयातील सर्व कर्मचा-यांनी मेहनत घेतली.